सक्षम नेतृत्वाला सलाम – बियाणी परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव!

मा. ना. गुलाबराव पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
सक्षम नेतृत्व, सकारात्मक दृष्टिकोन, कार्यसम्राट वृत्ती आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीमुळे लोकनेते गुलाबराव पाटील हे जनतेत अत्यंत लोकप्रिय आहेत.
“मंत्री गुलाबराव पाटील यांचा वाढदिवस विशेष : शुभेच्छा जाहिराती पाहा”
या विशेष दिनानिमित्त भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. मनोज बियाणी, डॉ. संगीता मनोज बियाणी (सचिव, बियाणी एज्युकेशन ग्रुप, भुसावळ) आणि बी.सी. बियाणी प्रा. लि./ बियाणी एज्युकेशन ग्रुप, भुसावळ यांच्या वतीने गुलाबराव पाटील यांना मन:पूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
आदरणीय ना. गुलाबभाऊ पाटील हे कर्तृत्व शिखराचे मेरुमणी होत ! ‘भाऊ’ शब्द खान्देशात कोणीही उच्चारला तर सर्वप्रथम ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर ना. गुलाबभाऊंचीच प्रतिमा उभी राहते. खान्देशाच्या मातीत गुलाबभाऊ हे प्रत्येकाच्या अंतकरणात ‘भाऊ’ म्हणूनच स्थित आहेत. गुलाबभाऊंचं असणार इतकं अतूट समीकरण या शब्दाशी जोडले आहे किंबहुना या शब्दाला एक वेगळा आयाम गुलाब भाऊंमुळेच प्राप्त झाला आहे. या शुभेच्छांमध्ये त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात मा. गुलाबराव पाटील यांचे समाजासाठीचे योगदान, विकासाची भूमिका आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची प्रशंसा केली.
भविष्यातही त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, आयुष्य निरोगी, आनंदी आणि यशस्वी जावो, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली.