अतिप्राचीन श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा

जळगाव प्रतिनिधी | प्रवीण पाटील | भुसावळ तालुक्यातील वेल्हाळे गावातील शतकानुशतके श्रद्धेचे व भक्तीचे प्रतीक असलेल्या श्री कपिलेश्वर महादेव मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा उत्साहात पार पडणार आहे. या निमित्ताने २८ जुलै २०२५ रोजी, सोमवार या दिवशी सकाळी १० वाजता भव्य अक्षय पात्र रथ मुकुट यात्रा काढण्यात येणार आहे.
या पवित्र सोहळ्याच्या ठिकाणी महामंडलेश्वर सुर्यमुनीजी महाराज (शेळगांवकर) असणार असून, अनेक गावकरी व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
वेल्हाळे येथील हे मंदिर अतिशय प्राचीन असून शिवकालीन इतिहास व भक्ती परंपरेचा साक्षीदार आहे. मंदिराचे शिल्पकाम, रचना व धार्मिक महत्त्व लक्षात घेता, हे मंदिर नव्याने सुसज्ज रूपात उभे करण्यासाठी श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट यांनी पुढाकार घेतला आहे. जुन्या मंदिराचा जिर्णोद्धार करून नवे मंदिर उभारण्यात येणार असून, यासाठी निधी संकलनाचे कार्यही सुरु आहे.
विशेष म्हणजे, या निमित्ताने ऑनलाईन देणगीसाठी QR कोडची सुविधाही भाविकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, मंदिराचा संपूर्ण आराखडा, जुन्या व नव्या मंदिराची छायाचित्रं देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
“चला वेल्हाळा – श्री शिव निमंत्रण” अशा उद्घोषासह गावभर आणि परिसरात मोठा उत्साह आहे. पहिल्यांदाच गावामध्ये अशा प्रकारची मूकुट यात्रा काढण्यात येत असून, सर्व नागरिकांनी, भक्तगणांनी व भाविकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.
वेबसाइट: www.kapileshwarmahadev.org
निमंत्रक: श्री कपिलेश्वर महादेव देवस्थान ट्रस्ट, वेल्हाळे, ता. भुसावळ, जि. जळगाव