वन्यजीव सप्ताहानिमित्त आश्रम शाळा कर्जाना येथे सातपुड्यातील जैवविविधतेवर PPT सादरीकरण
सातपुड्यातील जैवविविधतेचे रहस्य उघड! – वन्यजीव सप्ताहात विशेष PPT

जळगाव (३ ऑक्टोबर):
आज रोजी मा. जमीर शेख सर उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगांव, मा. एम. बी. पाटील सर सहाय्यक वनसंरक्षक चोपडा तसेच मा. विकेश ठाकरे सर वनपरिक्षेत्र अधिकारी वैजापूर यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेल्या दिनांक 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह निमित्ताने आश्रम शाळा कर्जाने येथे सातपुड्यातील जैवविविधता या विषयावर PPT सादरीकरण करण्यात आले.
या सादरीकरणात विद्यार्थ्यांना आपल्या सातपुड्यातील स्थानीक वनस्पती, ऑर्किड, पक्षी, वन्यजीव यांचे जैवविविधतेतील स्थान तसेच वन्यप्राण्यांच्या नोंदी घेण्याची पद्धत, मानव–वन्यजीव संघर्ष वाढणे मागची कारणे तसेच उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली. तसेच वन्यजीव संवर्धनाचे महत्व आणि प्राण्यांच्या प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्याची अत्यंत महत्वाची गरज असल्याने त्याबाबत विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
यानिमित्ताने धोक्यात असलेल्या वन्यजीव प्रजाती आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी यावल वनविभागाचे योगदान याबाबतही माहिती देण्यात आली. यावल वनविभागात राष्ट्रीय प्राणी वाघाचे अस्तित्व असल्याने आपला सातपुडा समृध्द असल्याचे विद्यार्थ्यांना PPT द्वारे सांगण्यात आले.
कार्यक्रमातील मान्यवर व सहभागी
सदरच्या कार्यक्रमात वैजापूर वनक्षेत्रातील वनपरिमंडळ अधिकारी वैजापूर अश्विनी धात्रक, वनपरिमंडळ अधिकारी कर्जाना अर्चना गवते, वनपरिमंडळ अधिकारी खाऱ्यापाडाव भावना सांगोरे, वनपरिमंडळ अधिकारी बोरअजंटी सारिका कदम तसेच वैजापूर वनक्षेत्रातील वनरक्षक बाजीराव बारेला, योगेश सोनवने, लेदा पावरा, संदीप ठाकरे, संदीप भोई, निखिल माळी, भारसिंग बारेला, विवेक पावरा, जेकाराम बारेला, समीर तडवी, इंदू बारेला, बानू बारेला, उज्वला बारेला, नेहा बारेला, निर्मला सस्ते, विजय शिरसाठ यांनी सहभाग नोंदवला.