यावल पोलीस स्टेशन CCTNS गुर नं. 365/2024, B.N.S.-2023 चे कलम 303,3(5) अन्वये दाखल गुन्हयातील चोरीस गेलेल्या वाहनांच्या बॅट-या गुन्हा दाखल झालेनंतर 2 तासांत आरोपींकडुन हस्तगत केले बाबत…

दि.7.9.2024 रोजी 22.00 ते दि.8.9.2024 चे सकाळी 10.00 वाजेचे दरम्यान साकळी ता. यावल या गावात मुजूमदार नगर मधील सैय्यद अशपाक सैय्यद शौकत यांचे खळयातील 2 ट्रॅक्टरच्या 12 हजार रुपये किमतीच्या 2 एक्साईड कंपनीच्या बॅट-या चोरून नेले बाबत फिर्यादि श्री सैय्यद अशपाक सैय्यद शौकत वय-32 रा. साकळी ता. यावल दिलेल्या फिर्याद वरून यावल पो स्टे ला CCTNS गु.र.नं.365/2024,B.N.S.-2023 चे कलम 303,3(5) अन्वये दि.9.9.2024 रोजी गुन्हा दाखल आहे.
मा. सहा. पोलीस अधिक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंह फैजपूर उप विभाग फैजपूर यांनी दिलेल्या सुचनेनुसार मा. पोलीस निरीक्षक, श्री प्रदिप ठाकुर यावल पो स्टे यांनी सदर गुन्हयाचा तपासकामी पो.ह.2654 अर्जुन सोनवणे, पो.ना.1043 मोहसीन खान, पो.कॉ.2770 अल्लाउद्यीन तडवी, पो.कॉ. 1165 एजाज गवळी, PC 1803 अनिल साळुंखे, सर्व नेम. यावल पोलीस स्टेशन यांचे पथक तयार करून मार्गदर्शन व सुचना दिल्या.
सदर पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढुन गुन्हा दाखल झाल्यापासुन 2 तासाचे आत सापळा रचुन संशयीत म्हणुन 1. भूषण राजू तायडे, वय-22. 2. दशरथ शालीक भालेराव वय-21 3. साहिल रविंद्र सूरवाडे, वय-21, 4. रणधीर भिला सोनवणे वय-22 सर्व रा. साकळी ता. यावल जि जळगाव यांना साकळी परीसरातून ताब्यात घेवून त्यांना यावल पोलीस स्टेशनला आणून सदर आरोपीतांचे विलगीकरण करून त्यांना कुशलतेने विचारपुस करून त्यांचेकडुन खालील प्रमाणे गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे.
1.06,000/-
एक एक्साईड कंपनीची ट्रॅक्टरची बॅटरी. (जु.वा. कि.अ.)
2.06,000/- एक एक्साईड कंपनीची ट्रॅक्टरची बॅटरी. (जु.वा. कि.अ.)
एकुण- 12,000/-रुपये
अशाप्रकारे सदरचा गुन्हादाखल झाल्यापासुन 2 तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणुन त्यातील
आरोपींकडुन वरील किमतीचा व वर्णनाचा मुद्देमाल हस्तगत करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला असुन अधीक तपास
पोलीस निरीक्षक श्री प्रदिप ठाकुर यावल पो स्टे यांचे सुचनांप्रमाणे पो हे कॉ 2554 अर्जुन सोनवणे नेम यावल पो स्टे करीत आहेत.