क्राईम

मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री गणेश वाघमारे, श्री दत्तात्रय पोटे, पोह गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णु बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.वर नमुद पथकातील अमंलदार पोह विनोद पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, टाकरखेडा ता. जामनेर येथील १) विशोल गोपाल भोई, रा. टाकरखेडा ता. जामनेर हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे बरेच दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. परंतु वर नमुद पथकातील अमंलदार यांनी सुरेश पाडवी हा त्याचे गावी टाकरखेडा येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास टाकरखेडा येथून ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतल्या प्रमाणे अजुन त्याचे दोन साथीदार २) देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, ३) सुरज अशोक पारधी (सांळुखे), रा.टाकरखेडा ता. जामनेर जि. जळगाव यांना ताब्यात घेवून त्याचे कडून ४,३३,०००/- रु. किं.च्या १० मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत १) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ५८३/२०२४, २) एम.आय.डी.सी. पो.स्टे.ला गुरनं २५८/२०२४, ३) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ३३२/२०२४, ४) भुसावळ शहर पो.स्टे. CCTNS NO १५२/२०२४, ५) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ६३३/२०२४, ६) एम.आय.डी.सी.पो.स्टे.ला गुरनं ६५०/२०२४ भादवि कलम भा.न्या.सं.३०३ (२), ७) जळगाव शहर पो.स्टे. गुरनं ३८७/२०२४, ८) जिल्हापेठ पो.स्टे. गुरनं ३११/२०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरीत२ मोटार सायकल यांचा शोध सुरु आहे. सदरची कारवाई मा.डॉ. श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्री अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!