रक्षा खडसे अपात्र होण्यापासून वाचल्या, अपक्ष उमेदवाराचा आक्षेप

जळगाव जिल्ह्यामधील रावेर लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे यांच्यावर आक्षेप नोंदवला होता परंतु वेळेत पुरावे सादर न करू शकल्यामुळे अर्ज फेटाळण्यात आला त्यामुळे रक्षक खडसे अपात्र होण्यापासून वाचले आहे. अपक्ष उमेदवार या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे माध्यमाचे बोलताना सांगितले .
जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आज 26 त्यांनी त्या दिवशी अपक्ष उमेदवार संजय प्रल्हाद कांडेलकर यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार रक्षा निखिल खडसे यांच्यावर आक्षेप नोंदविला निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे पत्र दिले मात्र दिलेल्या वेळेत पुरावे सादर न करू शकल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळण्यात आल्या.
संजय प्रल्हाद कांडलकर यांनी त्यांच्या नामनिर्देशन पत्र मध्ये एसआय टीच्या चौकशीमध्ये खडसे कुटुंबांना 137 कोटीचा दंड गौण खनिज प्रकरणांमध्ये आकारण्यात आलेला आहे व या संबंधित त्यांच्याही नोटीस देण्यात आल्या आहेत मध्यंतरी शासनाकडून यावर स्थगिती आणली होती या विरोधात तक्रारदार मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील हे हायकोर्टात गेलेले आहेत याप्रकरणी 30 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहेत या प्रकरणात जिल्हाधिकारी. प्रांतधिकारी तहसीलदार मंडलाधिकारी तलाठी अधिकारी यांचे लेखी मागवलेले आहे मात्र त्यांनी याचा उल्लेख नामनिर्जन पत्र भरताना केलं नसल्याचं अपक्ष उमेदवार संजय प्रल्हाद कांडलकर यांनी सांगितले जरी रावेरचे निवडणूक निर्णय अधिकारी व अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी अर्ज पेटलेला जरी असला तरी या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे अपक्ष उमेदवार संजय कांडेलकर यांनी सांगितले