प्रविण पाटील यांना राजनंदनी बहुउद्देशीय संस्था , जळगाव यांच्या तर्फे समाजभूषण पुरस्कार प्राप्त

जळगाव प्रतिनिधी:आज वसंतवाडी (जळके)ता.जळगाव येथील प्रविण रामदास पाटील यांना राजनंदनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांच्या तर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार मिळाला. प्रविण पाटील हे १९९७पासुन पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांनी गावकरी, देशदूत, लोकमत या दैनिक वृत्तपत्रात काम केले आहे सध्या Live महाराष्ट्र न्यूज ला उपसंपादक म्हणून ते काम पाहत आहेत ते जळगाव ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्यामुळे समाजातील विविध घटकांना प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष लाभ मिळतोय हे कार्य व योगदान लक्षात घेऊन राजनंदनी बहुउद्देशीय संस्था, जळगाव यांनी त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२३-२०२४साठी निवड करुन सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन सपत्नीक गौरव केला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सौ. संदिपा वाघ,शालीग्राम मालकर, डॉ. महेंद्रजी काबरा,मिनाक्षी चव्हाण, डॉ. शैलेंद्र भनगे , युवराज पाटील , ज्ञानेश्वर वाघ ,तुळशिराम इंगळे तसेच समाजभूषण सुमीत पाटील हे मान्यवर उपस्थित होते हा समाजभूषण पुरस्कार मिळाल्यानंतर प्रविण पाटील यांना सर्व क्षेत्रातुन शुभेच्छा प्राप्त होत आहेत