एलसीबी पोलीस निरीक्षक बदलीवर राजकीय हस्तक्षेप? वरिष्ठांवर दबाव का?
राजकीय हस्तक्षेप? वरिष्ठांवर दबाव का?

जळगाव जिल्ह्यातील एलसीबी बदल्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अवघ्या वर्षभरात दोन निरीक्षकांची बदली झाल्यामुळे पोलीस दलात संभ्रम आणि चर्चा सुरु आहे. नुकतीच निरीक्षक संदीप पाटील यांची तडकाफडकी बदली केली गेली, आणि त्यांच्या जागी राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.“ही बदली राजकीय हस्तक्षेपामुळे आहे का किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कोणाचा दबाव आहे का?”
पोलीस दल राजकीय दृष्टीने चालतो ? आणि अनेकवेळा सक्षम अधिकारी सुध्दा त्यांच्या निर्णयासाठी बाह्य दबावाला सामोरे जातात? गायकवाड यांनी पदभार स्वीकारताच एलसीबीमध्ये कामकाजाला वेग आला. गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर नियोजन आखले आणि तत्पर कारवाई सुरू केली. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारीवर परिणाम झाला असून, नागरिक आणि पोलीस दलात त्यांची कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे.
सध्या एलसीबीमध्ये कार्यरत अधिकारी, जे कामगिरीने आणि डॅशिंग कार्यपद्धतीने जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आळा घालत आहेत, त्यांना अचानक हलवण्याचे निर्णय घेतले जात आहेत. हे प्रश्न उपस्थित करतात की, वरिष्ठ अधिकारी इतके सक्षम नाहीत का की स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत? की परकीय दबावामुळे खुर्ची हलवली जात आहे?चूक नसतांनां सुद्धा बदली ?
मात्र, या नियुक्तीबाबत पुन्हा चर्चा सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर गंभीर विचार करणे गरजेचे आहे. चुकी नसताना अधिकारी हलवणे आणि जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणे योग्य नाही.