बातम्या

राजकीय समीकरणांमध्ये खळबळ! रजनी सावकारेंचा ‘भावी नगराध्यक्षा’ टॅग व्हायरल!

भुसावळ (जळगाव): जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्या असतानाच, राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे. विशेषतः भुसावळ शहरात निवडणुकीपूर्वीच वातावरण तापू लागले असून, भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘भावी नगराध्यक्षा’ म्हणून रजनी सावकारे यांचे नाव सोशल मीडियावर जाहीर केल्याने चर्चेला उधाण आले आहे.

शाळा बंद, विद्यार्थी रडत होते… पण जिल्हा प्रशासन बनले संकटमोचक!

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आणि भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचे नाव कार्यकर्त्यांनी पुढे केल्याने भाजपच्या अंतर्गत गटबाजीतील नवसंजीवनीची चाहूल लागली आहे. सोशल मीडियावर ‘भावी नगराध्यक्षा’ अशा उल्लेखासह त्यांचे फोटो झळकत असून, कार्यकर्त्यांनी या पोस्ट मोठ्या प्रमाणात शेअर केल्या आहेत. स्थानिक राजकारणात यामुळे मोठी चर्चा रंगू लागली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हिरवा कंदील दिल्यानंतर जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. अद्याप प्रभाग रचना जाहीर झालेली नसली तरी, राजकीय पक्षांनी आतापासूनच रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत होणार, हे स्पष्ट होत आहे.

बास्केटमध्ये ठेवलेलं बाळ आणि बाजूला ठेवलेली एक चिठ्ठी…

भुसावळ नगरपालिकेचा मागील इतिहास पाहता, भाजपचे वर्चस्व कायम राहिले आहे. मध्यंतरी खडसे गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या इनिंगमुळे पक्षात तुटाफूट झाली होती. मात्र, आता अनेक कार्यकर्ते पुन्हा भाजपमध्ये परतल्यामुळे पक्ष अधिक मजबूत झाल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर रजनी सावकारे यांचे नाव पुढे आल्याने, सावकारे गट पुन्हा ताकद दाखवत असल्याचे दिसून येते. आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी लागेल हे अद्याप स्पष्ट नसले तरी, रजनी सावकारे यांचे नाव भाजप वर्तुळात आघाडीवर असल्याचे संकेत मिळत आहेत.

‘आमदार पती आणि नगराध्यक्षा पत्नी’ हे समीकरण भुसावळसाठी नवे असले तरी, प्रभावी नेतृत्व आणि सशक्त गटबळाच्या जोरावर सावकारे दाम्पत्य राजकीय नकाशावर आपली छाप सोडण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!