साई मोरया गणेशोत्सव मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर — अध्यक्षपदी गणेश कुमावत, सचिवपदी दीप पाटील

खोटेनगर (शहर) — शहरातील खोटेनगर येथील साई मोरया मित्र मंडळाचा २०२५ सालचा गणेशोत्सव सोहळा यंदा विशेष ठरणार आहे. या वर्षी मंडळाच्या स्थापनेला २२ वर्षे पूर्ण होत असून, त्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदी गणेश कुमावत तर सचिवपदी दीप पाटील यांची निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रिया संस्थापक अध्यक्ष उमाकांत जाधव, उपाध्यक्ष हितेश पाटील आणि सचिव सिद्धांत कदम यांच्या उपस्थितीत पार पडली.
२२ फूट उंचीचा बाप्पा
या विशेष वर्षानिमित्त खोटेनगरमध्ये २२ फूट उंचीचा देखणा व आकर्षक साई मोरया बाप्पा विराजमान होणार आहे. भक्तांसाठी भव्य सजावट, अद्ययावत मंडप आणि दिव्य वातावरणाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांचा मेळावा
गणेशोत्सव काळात मंडळाकडून विविध अध्यात्मिक, पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये —
- मनोरंजनपर खेळ
- आरोग्य तपासणी शिबीर
- कीर्तन व प्रवचन
- बालगोपालांसाठी शाडूमातीपासून गणपती बनवण्याची स्पर्धा
- चित्रकला स्पर्धा
- रक्तदान शिबीर
- वृक्षारोपण
- रांगोळी स्पर्धा
- प्रश्नमंजुषा
अशा विविध कार्यक्रमांद्वारे सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्सवात सक्रिय सहभाग राहणार आहे.
नूतन कार्यकारिणी 2025
- अध्यक्ष: गणेश कुमावत
- उपाध्यक्ष: चेतन हातकर, केतन पाटील
- सचिव: दीप पाटील
- सहसचिव: हर्षल पाटील, प्रतीक सोनवणे
- कार्याध्यक्ष: वेदांत ईशी
- खजिनदार: धीरज पाटील
-
सदस्य: दिनेश पाटील, अनिल चव्हाण, पंकज पाटील, प्रसन्न जाधव, मंथन ईशी, अजय खरात, निखिल पाटील, सुदर्शन ईशी, धीरज महाजन, ज्ञानेश्वर पाटील, जयेश महाजन, संजय खरात, हर्षल चौधरी, अजय मोरे, गोपाल टीकारे, आकाश गुजर, मोहित पाटील, लोकेश बारसे, वैभव चंद्रात्रे, कल्पेश ठाकरे, पराग पाटील, सोहम आमोदकर, चेतन कोळी, आदित्य कुमावत, देवेन ईशी, सिद्धेश सोनवणे, मनीष ईशी, केतन देवराज, उमेश ठाकूर.
गणेश भक्तांसाठी विविध उपक्रमांनी सजलेला हा उत्सव खोटेनगरवासीयांसाठी अविस्मरणीय ठरणार असल्याचा विश्वास मंडळाने व्यक्त केला आहे.