जळगाव बस स्टँडवर खिसे कापणारे जेरबंद! LCB ची मोठी कारवाई

जळगाव जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी वारंवार खिसे कापून पैसे चोरी झाल्याचे प्रकार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव), मा. श्री. अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देत, श्री. संदीप पाटील (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी सूचनाद्वारे मार्गदर्शन केले. त्यानुसार, पाटील यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व अंमलदारांना खिसे कापून चोरी करणाऱ्या आरोपींचा तपास लावण्याच्या सूचना दिल्या.
दि. २५ जून २०२५ रोजी पोहेकॉ प्रविण भालेराव व पोहेकॉ अक्रम शेख (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांना गोपनीय माहिती मिळाली की, अमरावती येथील काही खिसे कापणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार सध्या जळगाव शहरातील बस स्टँड परिसरात आहेत. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळवण्यात आली. त्यांनी तात्काळ पोउनि. श्री. शरद बागल यांच्यासह पोहेकॉ अक्रम शेख, पोहेकॉ नितीन बाविस्कर, पोहेकॉ प्रविण भालेराव, पोना किशोर पाटील, व पोकॉ रविंद्र कापडणे या पथकास बस स्टँड परिसरात पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिल्या.
या पथकाने सतर्कतेने बस स्टँड परिसरात पेट्रोलिंग सुरू केले असता, तीन संशयित व्यक्ती गर्दीचा फायदा घेत चोरी करण्याच्या उद्देशाने फिरताना दिसले. पथकाने तत्काळ कारवाई करत त्यांना अटक करून स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात चौकशीसाठी आणले. चौकशी दरम्यान त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली:
1. अहमद बेग कादर बेग (वय ६२), रा. मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट, पोलीस स्टेशन जवळ, अमरावती
2. हफिज शाह हबीब शाह (वय ४९), रा. बलगाव, सकीनगर, अमरावती
3. अजहर हुसैन हफर हुसेन (वय ४९), रा. सुपिया मशीद समोर, रहमत नगर, अमरावती
चौकशीत त्यांनी २४ जून २०२५ रोजी दुपारी जळगाव बस स्टँडमध्ये बसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाच्या खिशातून दोन बंडल (प्रत्येकी १०० रुपये) चोरी केल्याची कबुली दिली.
पुढील तपासात त्यांची अंगझडती घेण्यात आली, त्यात खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला:
₹३३,८३०/- रोख ₹१७,५००/- किंमतीचे ५ मोबाईल ०१ रेक्झिन बॅग ₹५,००,०००/- किंमतीची टाटा इंडिका व्हिस्टा कार
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹५,५१,५३०/- इतकी आहे.
सदर प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात CCTNS क्र. १६१/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यांना जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विशेष बाब म्हणजे, आरोपी अहमद बेग कादर बेग याच्यावर अमरावती शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये चार गुन्हे आधीच दाखल आहेत.
या कारवाईबाबत मा. डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्यावतीने सर्व जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी प्रवासादरम्यान – विशेषतः रेल्वे स्टेशन, बस स्टँड, इतर गर्दीच्या प्रवासी वाहतूक स्थळांवर – आपल्या मौल्यवान वस्तू व रकमेची योग्य ती काळजी घ्यावी. कोणीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ डायल 112 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच, जळगाव जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांना अशा ठिकाणी नियमित पेट्रोलिंग करण्याच्या स्पष्ट सूचना मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिल्या आहेत.
ही कार्यवाही खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:
डॉ. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव
कार्यवाहीमध्ये सहभागी अधिकारी व अंमलदार: पोउनि. शरद बागल, पोहेका/सुनिल दामोदरे, पोहेकॉ/अक्रम शेख, पोहेकॉ/नितीन बाविस्कर, पोहेकॉ/प्रविण भालेराव, पोना/किशोर पाटील, पोकॉ/रविंद्र कापडणे
या सर्व पथकाचे व पोलीस विभागाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.