बातम्या

जळगाव येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याला 15 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले!

 

जळगाव | 04 एप्रिल 2025 – जळगाव जिल्ह्यातील आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत जुलाल मोरे यांना 15,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

प्रकरण काय आहे?

या कारवाईत तक्रारदार हे जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जिल्हा परिषद, जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पालघर येथे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिनियुक्ती झाली असून, त्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांच्याकडे सादर करणे आवश्यक होते.

याच प्रक्रियेसाठी डॉ. जयवंत मोरे यांनी डॉ. सचिन भायकर यांच्या नावे तक्रारदाराकडे 30,000 रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार तक्रारदाराने दिनांक 03/04/2025 रोजी ACB जळगाव येथे नोंदवली.

सापळा रचून रंगेहाथ कारवाई

तक्रारीची ACB विभागाकडून तत्काळ पडताळणी करण्यात आली. दिनांक 03/04/2025 व 04/04/2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती आरोपीने तक्रारदाराकडून 15,000 रुपये लाच रक्कम स्वीकारली. हे संपूर्ण प्रकरण ACB च्या पथकाने नोंदवत आरोपीस रंगेहाथ अटक केली आहे.

संपूर्ण कारवाईची माहिती

घटक: जळगाव

तक्रारदार: वय 44 वर्षे

आरोपी लोकसेवक: डॉ. जयवंत जुलाल मोरे, वय 46 वर्षे

पद: अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

वर्ग: वर्ग 1, आरोग्य विभाग

लाच मागणी तारीख: 03/04/2025

लाच स्वीकृती तारीख: 04/04/2025

लाच मागणी रक्कम: ₹30,000/-

लाच स्वीकृती रक्कम: ₹15,000/- (तडजोडीनंतर)

कारवाई करणारे अधिकारी

पर्यवेक्षण अधिकारी: श्री. योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक, ACB जळगाव

सापळा अधिकारी:

श्रीमती नेत्रा जाधव, PI ACB जळगाव

Hc महाजन

PC सूर्यवंशी

PSI सुरेश पाटील (चालक)

मार्गदर्शक अधिकारी: मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र

आरोपी लोकसेवकांचे सक्षम अधिकारी

मा. प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व नागरिकांना आवाहन

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी व्यक्तीने लाच मागितल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.

ACB जळगाव संपर्क:

दुरध्वनी क्रं.: 0257-2235477

टोल फ्री क्रं.: 1064

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!