बातम्या
तक्रार निवारण दिन (जनता दरबार) आयोजनजळगांव:
जळगांव उपविभागातर्फे “तक्रार निवारण दिन (जनता दरबार)” चे आयोजन दिनांक २१/१२/२०२४ रोजी सकाळी १०:३० वाजता ते १४:०० वाजता पर्यंत मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंडजवळ जळगांव येथे करण्यात आले आहे.या दिवशी श्री संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगांव उपविभाग तसेच जळगांव उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि अंमलदार उपस्थित राहणार आहेत.जळगांव उपविभागातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तसेच तक्रारीसाठी असलेल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी २१/१२/२०२४ रोजी १०:३० वाजता ते १४:०० वाजता पर्यंत मंगलम हॉल, पोलीस मुख्यालय ग्राउंडजवळ जळगांव येथे हजर राहावे.तक्रार निवारण दिनाचा उपयोग नागरिकांना आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक उत्तम संधी आहे.