मुख्यमंत्र्यांच्या येण्याने अधिकारी ॲक्शन मोडमध्ये

जळगांव येथील महानगरपालिकेमध्ये आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा आढावा घेण्यात आला यामधून दिवस व रात्र काम करून शहरी भागातील 39185 तर ग्रामीण भागातील 76 हजार 473 बहिणीचे अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत. तर शहरी भागातील ही संख्या जवळपास 50 पर्यंत जाईल अशी अशा व्यक्त करण्यात आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा आढावा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आमदार राजू मामा भोळे, उपाआयुक्त तसेच सदस्य स्वप्निल परदेशी व अशासकीय सदस्य उपस्थित होते यावेळी शहरामध्ये ऑनलाईन 37 हजार 232 ऑफलाईन 1923 अर्ज प्राप्त झाले असून 39185 अर्ज मंजूर झाले आहेत तर तालुक्यात 76,473 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहे. आयुक्तांनी दिवस रात्र बहिणींचे अर्ज भरण्याचे सांगितले असून जळगाव शहरातील ही संख्या 45 ते 50 हजारापर्यंत पोहोचत अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आलेली आहे सर्व्हर लोड असल्याकारणाने बहिणीचे अर्ज भरण्यात अडचणी येत आहे त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्रीचे काम करणारं आहे
