बातम्या
BIG NEWS : शिंदेंचा राजीनामा, राजकीय विश्वात खळबळ

राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटल्याची चर्चा असून, मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी 11 वाजता, लाडक्या बहिणींच्या उपस्थितीत राजीनामा देणार आहेत. नव्या सरकारचा शपथविधी 2 डिसेंबरला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा होती. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीतील महायुतीच्या यशानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्रिपदासाठी आपला हक्क प्रस्थापित केला.