बातम्या

नवीन पोलीस निरीक्षकांचा ‘धडक स्टाईल’! होंडा सिटी गाडीत गांजा पकडला

यावल, दि. 5 जून 2025 – यावल पोलीस ठाण्याच्या पथकाने आज सकाळी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार केलेल्या कारवाईत गांजाची विक्री करण्यासाठी आलेला एक इसम रंगेहात पकडण्यात यश आले आहे. ही कारवाई किनगाव – चिंचोली रोडवरील हजरत सैय्यद जलाल शहावली दर्गाजवळ करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून सुमारे 63,000/- रुपये किमतीचा गांजा आणि 3.63 लाख रुपये किमतीची होंडा सिटी कार जप्त करण्यात आली आहे.

गुलाबराव पाटलांना शुभेच्छांचा पूर! बघण्यासाठी इथे क्लिक करा

पोलीस निरीक्षक मा. श्री. रंगनाथ धारबळे यांना सकाळी 9.20 वाजता एका विश्वासार्ह बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, एक अनोळखी इसम गांजा विक्रीसाठी त्या परिसरात येणार आहे. त्यानुसार त्यांनी तात्काळ कारवाईचे नियोजन करून CCTNS नोंद केली आणि वरिष्ठांच्या मौखिक परवानगीने सापळा रचण्यात आला.

पोलीस दलात मोठा फेरबदल! कोण कोठे गेले, पाहा संपूर्ण यादी बघण्यासाठी इथे क्लिक करा 👈 

 

या कारवाईसाठी पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल्स, पोलीस कॉन्स्टेबल्स, पंच साक्षीदार, फोटोग्राफर, वजन काटा धारक व FSL टीम अशा संपूर्ण पथकाची रचना करण्यात आली. पंच साक्षीदार म्हणून संदीप बाळकृष्ण पाटील आणि याकुब अहमद तडवी हे उपस्थित होते. फोटोग्राफर अजय नेवे आणि वजनकाटा धारक दीपक दरेकर यांनीही या कारवाईत सक्रिय सहभाग नोंदवला.

साध्या वेशात गेलेल्या पोलिसांनी किनगाव शिवारात संशयित होंडा सिटी (MH 01-BB-1407) कार ओळखून पाळत ठेवली. त्यावेळी गाडीत बसलेला इसम पोलीस पाहून घाबरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याचे नाव रौनक रूबाब तडवी (वय 20, रा. कुसुंबा, ता. रावेर, जि. जळगाव) असे आहे.

जळगावच्या रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; शिवसेना उबाठा आक्रमक!

त्याच्या अंगझडतीदरम्यान व कारच्या तपासणीत खालील प्रमाणे गांजाचा साठा आढळून आला:

5.200 ग्रॅम गांजा (मूल्य: 53,000/-) – मोठ्या पिशवीतून

1.100 ग्रॅम गांजा (मूल्य: 10,000/-) – कॅरी बॅगेतून

एक होंडा सिटी कार (मूल्य: 3,63,000/-)

FSL युनिटच्या प्राथमिक चाचणीमध्येही हा गांजा अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.

सदर कारवाईसाठी संपूर्ण तपास प्रक्रिया पंचांसमक्ष पार पाडण्यात आली. जप्त केलेल्या दोन बॉक्सेस व गाडीवर पंचांचे, आरोपीचे, फोटोग्राफरचे व वजनकाटा धारकाचे सही केलेले लेबल लावून सील करण्यात आले.

मंत्री गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत साखर वाटप कार्यक्रम

आरोपी रौनक तडवी याच्यावर NDPS कायदा 1985 अंतर्गत कलम 8 (C), 20(b)(ii)(b) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर पुढील कारवाईसाठी यावल पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!