राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. नितीन पाटील यांचा भाजपात प्रवेश

जळगाव (प्रतिनिधी): धरणगाव तालुक्यातून एक मोठी राजकीय घडामोड घडली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय डॉक्टर सेल अध्यक्ष डॉ. नितीन वसंतराव पाटील यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश केला.
चमगाव येथील रहिवासी आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित नाव असलेले डॉ. नितीन पाटील हे सामाजिक कार्यासाठी देखील ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक कामामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा असून त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे धरणगाव तालुक्यातील राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
भाजपात एकाच वेळी अनेकांचा प्रवेश
डॉ. नितीन पाटील यांच्यासह अनेक महत्वाच्या स्थानिक नेत्यांनी देखील भाजपात प्रवेश केला. यात माजी सरपंच संभाजी पाटील उर्फ भैय्या पाटील, बिलखेड्याचे माजी सरपंच बंडू दादा काटे, विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील, उपसरपंच श्री दिलीप भदाणे यांचा समावेश आहे.
जीएम फाउंडेशनमध्ये भव्य प्रवेश सोहळा
या सर्वांचा भाजप प्रवेश सोहळा जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे प्रमुख नेते गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत जीएम फाउंडेशन, जळगाव येथे पार पडला.
या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमास आमदार राजू मामा भोळे, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, पी. सी. पाटील, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य संजय महाजन, धरणगाव मंडळाचे तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, पारधी मंडळाचे तालुकाध्यक्ष किशोर झवर, पंचायत समितीचे माजी सदस्य गजानन सावंत, बाजार समितीचे संचालक ईश्वर चिंधु सावंत, तालुक्याचे माजी सरचिटणीस कन्हैया रायपुरकर, भाजयुमोचे चंदन पाटील, विनोद पाटील, दिलीप मराठे, सोनवणे रावसाहेब, श्याम भाऊ पाटील, भगवान गणपत पाटील, राजेंद्र हरी पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.