बातम्या

ना. संजय राठोड यांची जामनेरला भेट – पवार कुटुंबाशी प्रेमळ संवाद!

जामनेर (जळगाव) | महाराष्ट्र राज्याचे प्रतिष्ठित नेते व शिवसेना (शिंदे गट) चे ज्येष्ठ नेते मा. ना. संजय भाऊ राठोड साहेब यांनी आपल्या बंजारा समाज संवाद दौऱ्या अंतर्गत जामनेर तालुक्यातील दौऱ्यादरम्यान अ‍ॅड. भरत पवार, शिवसेना तालुका प्रमुख, जामनेर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

या भेटीत ना. राठोड साहेबांनी घरगुती वातावरणात अत्यंत आपुलकीने पवार कुटुंबीयांचे स्वागत स्वीकारले. त्यांनी अ‍ॅड. भरत पवार व त्यांच्या कुटुंबीयांशी प्रेमपूर्वक संवाद साधत सामाजिक, राजकीय व संघटनात्मक बाबतीत सकारात्मक चर्चा केली.

या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये

  • डॉ. तुषार राठोड
  • पितेश शर्मा
  • सुभाष जाधव
  • निलेश जाधव (स्वीय सहाय्यक)
  • धरम चव्हाण (माजी पंचायत समिती सभापती)
  • आत्माराम जाधव
  • अरुण पवार
  • मोरसिंग राठोड
  • भाईदास चव्हाण
  • लता राठोड
  • रोहन राठोड
  • राजु सर

व इतर बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत जामनेर तालुक्यात बंजारा समाजाच्या संघटनाबळ वाढविण्यावर, तसेच आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये बंजारा समाजातील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत विस्तृत चर्चा झाली.

शिवसेना पक्षाच्या जडणघडणीसाठी बंजारा समाजाचा सक्रिय सहभाग वाढवावा, असे आवाहन मा. राठोड साहेबांनी उपस्थितांना केले. यावेळी त्यांनी बंजारा समाजाच्या प्रगतीविषयी आणि त्यांच्या हक्कांसाठी शिवसेना कटीबद्ध असल्याचेही ठामपणे सांगितले.

ही भेट केवळ औपचारिक न राहता, संघटनाच्या मजबुतीसाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. जामनेर तालुक्यातील बंजारा समाजाचे पुढील नेतृत्व घडविण्याच्या दिशेने हा संवाद टप्पा मोलाचा ठरला, असे प्रतिपादन अ‍ॅड. भरत पवार यांनी यानंतर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!