क्राईम

खून उघड! पोलिसांनी केलं प्रकरणाचा छडा – आरोपी जेरबंद

दि. २२/०६/२०२५ रोजी सकाळी ७.०० वाजेच्या सुमारास फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कसवा पिंप्री ते पिंपळगांव चौखांवे रस्त्यावर एक पुरुष जातीचे प्रेत आढळून आल्याची माहिती पोलीसांना मिळाली. सदर प्रकार हा घातपाताचा असल्याचा संशय आल्यामुळे व मृत व्यक्तीची ओळख पटवणे गरजेचे असल्याने परिसरातील नागरिकांकडे चौकशी केली असता मृत इसमाचा ओळख पटली असून तो कसवा पिंप्री गावातील शुभम धनराज सुरळकर असल्याचे निष्पन्न झाले.

घटनेत घातपाताचा संशय असल्याने गावचे पोलीस पाटील यांनी फत्तेपुर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून त्यावरून गु.र.नं. १०२/२०२५ भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ३४ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील गंभीरता लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक जळगांव श्री. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व फत्तेपुर पोलीस स्टेशनला बारकाईने तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी, अंमलदार व फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. धनंजय येरुळे यांनी तपास पथकास मार्गदर्शन करत सांगितले की, सदर खून या ठिकाणी न होता मृतदेह दुसऱ्या ठिकाणाहून येथे आणून टाकण्यात आलेला आहे.

त्यानुसार कसवा पिंप्री व फत्तेपुर परिसरात गुप्त बातमीदारांमार्फत व नागरिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे असे समजले की मयत शुभम याचा वडिलांशी नेहमी वाद होत असे. दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी माहेरी गेली होती. याच्या अनुषंगाने पोलिसांनी शुभम याच्या घरी तपास केला असता घरातील खोलीत चटईखाली रक्ताचे डाग आढळले.

संशयावरून शुभमचे वडील धनराज सुपडू सुरळकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कबुली दिली की, शुभम दारू पिऊन घरात त्रास देत असल्यामुळे त्याने त्याचा खून केला. रात्री झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह हलवण्यासाठी दुसरा मुलगा गौरव धनराज सुरळकर व मोठा भाऊ हिरालाल सुपडु सुरळकर यांना उठवून बोलावून घेऊन तीन जणांनी मिळून मृतदेह गाडीत टाकून पिंपळगाव चौखांवे रोडवर नेऊन फेकून दिला.

या प्रकऱणात आरोपी क्र. १ धनराज सुपडु सुरळकर वय ५२, आरोपी क्र. २ गौरव धनराज सुरळकर व आरोपी क्र. ३ हिरालाल सुपडु सुरळकर, सर्व रा. कसवा पिंप्री, ता. जामनेर, यांनी मिळून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या परिसरातून आरोपी क्र. २ व ३ यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा उपविभाग श्री. धनंजय येरुळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक श्री. संदीप पाटील, फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. अंकुश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकॉ/विनोद पाटील, पोहेकॉ/लक्ष्मण पाटील, पोना/राहुल पाटील, पोना/हेमंत पाटील, पोकॉ/जितेंद्र पाटील, पोकॉ/ईश्वर पाटील, पोकॉ/राहुल महाजन, पोकॉ/भूषण पाटील, चा.पोहेकॉ. भरत पाटील, दर्शन ढाकणे व फत्तेपुर पोलीस स्टेशनचे अंमलदार यांनी केली असून पुढील तपास प्रभारी अधिकारी श्री. अंकुश जाधव करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!