बातम्या

भुसावळात मोटारसायकल चोराला DB पथकाकडून गजाआड – 3 दुचाकी हस्तगत!

बाजारपेठ पोलिसांचे मोठे यश – 2.25 लाखांच्या तीन मोटारसायकली परत!

भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन डी.बी. पथकाने चोरीच्या मोटारसायकलींच्या मालिकेत गुन्हा करणाऱ्या आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईत एकूण 2 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 3 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, आरोपीसोबत विधी संघर्षित बालकाचाही सहभाग उघड झाला आहे.

फिर्यादीकडून तक्रार

भुसावळ येथील पांडुरंगनाथ नगरातील सुनिल पांडुरंग इंगळे यांनी आपली रॉयल एनफिल्ड बुलेट 350 सीसी (क्र. MH-19-ED-7650, किंमत 1,25,000/- रुपये) चोरी झाल्याची तक्रार दिली होती. यावरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजी. नं. 389/2025, भादंवि कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांना मिळालेली माहिती

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, चोरी करणारा आरोपी बुरहानपूर (म.प्र.) येथील रहिवासी आहे. त्यानुसार डी.बी. पथकाने सापळा रचून अरशद खान अहमदखान (वय 22, रा. खाजा नगर, आझाद नगर, बुरहानपूर, म.प्र.) यास ताब्यात घेतले.

आरोपीची कबुली

चौकशी दरम्यान आरोपीने आपल्या साथीदार विधीसंघर्षित बालकासह वरील मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून 3 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.

हस्तगत मोटारसायकलींची माहिती

  1. रॉयल एनफिल्ड बुलेट 350 सीसी, क्र. MH-19-ED-7650, किंमत 1,25,000/- रुपये
    (भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. गुन्हा रजी नं. 389/2025)

  2. बजाज प्लॅटीना 100 ES, क्र. MH-19-DS-3722, किंमत 50,000/- रुपये
    (भुसावळ बाजारपेठ पो. स्टे. गुन्हा रजी नं. 389/2025)

  3. बजाज CT-100, लाल रंगाची, विना नंबर, किंमत 50,000/- रुपये
    (चेसीस नं. MD2A18AY8HWB05833 व इंजिन नं. DUYWHB75911)

एकूण किंमत – 2,25,000/- रुपये.

मार्गदर्शनाखालील कारवाई

सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वाखालील डी.बी. पथकातील
स.पो.नि. नितीन पाटील, पो.उपनि. मंगेश जाधव,
पो.हे.कॉ. विजय नेरकर, कांतीलाल केदारे, किरण धणगर, रविंद्र भावसार,
चालक सहा.फौ. सुनिल सोनवणे,
पो.कॉ. सचिन चौधरी, हर्षल महाजन, जीवन कापडे, महेंद्र पाटील, जावेद शहा, भूषण चौधरी, अमर अढाडे, प्रशांत सोनार, योगेश माळी, योगेश महाजन
अशा पथकाने ही कारवाई केली.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ. विजय बळिराम नेरकर (क्र. 2692) हे करीत आहेत.

👉 या कारवाईमुळे भुसावळ शहरातील मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!