बातम्या
महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या गाठीभेटी सुरु
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी शहरातील लांडोरखोरी उद्यान येथे आज गुरुवारी सकाळी मॉर्निग वॉक करणाऱ्या नागरिकांशी सुसंवाद साधला. भाजपा मंडळ क्रमांक ९ मध्ये नागरिकांशी आ. भोळे यांनी जळगाव शहरात प्रगती होण्याबाबत व असलेल्या समस्यांचे निरसन करणेबाबत चर्चा केली. यावेळी नागरिकांनी आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहून महायुतीला मतदान करणार असल्याची ग्वाही दिली. प्रसंगी आ. भोळे यांनी मतदारसंघाशी संबंधित प्रश्नाची माहिती घेतली. विकासकामांसाठी पुन्हा एकदा संधी देऊन आ. राजूमामा भोळे यांच्या पाठीशी राहण्याचे भावनिक आवाहन यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी केले. ग्रामस्थांना वंदन करून भेटी-गाठी घेत आ. भोळे यांनी जेष्ठांकडून शुभाशिर्वाद घेतले.