
६ सप्टेंबर २०२५ || धरणगाव तालुक्यातील सोनवदजवळील अहिरे बुद्रुक गावचे प्रगतीशील शेतकरी व विकासोसायटीचे चेअरमन शरद पंढरीनाथ पाटील (वय ५५) यांचे दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ७.५० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्व. शरद पाटील यांनी आयुष्यभर कृषी क्षेत्रात नवीन प्रयोग करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. गावातील विकासकामे, सामाजिक उपक्रम तसेच शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे त्यांचा शेतकरी बांधवांमध्ये विशेष सन्मान होता. ते गेल्या काही वर्षांपासून विकासोसायटीच्या चेअरमनपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे सुपुत्र पत्रकार विजय शरद पाटील हे माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत.
स्व. शरद पाटील यांची अंत्ययात्रा दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता अहिरे बुद्रुक येथील राहत्या घरून निघून स्मशानभूमीत होणार आहे.
परिसरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.