लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार, कारवाईचे संकेत!
लाडकी बहीण योजना

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ पात्र महिलांना देण्यात येतो. मात्र, अलीकडच्या काळात या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी देखील अर्ज करून लाभ घेतल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शासनाकडून अशा अपात्र लाभार्थींची नावे वगळण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
जेवणाच्या बिलात ४ रू. व १ रू. चार्ज घेणे पडले महागात
यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, “मी आधीच स्पष्ट सांगितलं होतं की गाड्या, बंगले असणाऱ्यांसाठी ही योजना नाही. ही योजना गरिबांसाठी आहे, श्रीमंतांसाठी नाही.”त्यांनी पुढे असेही सांगितले की, “ज्या महिला योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांनी स्वतःहून योजनेतून माघार घ्यावी. ज्या गरजू आहेत, त्यांच्यापर्यंतच लाभ पोहोचणे गरजेचे आहे. योजनेचा गैरवापर अडचणीचा विषय ठरू शकतो. योग्य पात्र महिलांना न्याय मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन.”
सरकारने स्पष्ट नियम आखून दिले असून ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, किंवा ज्यांच्याकडे चारचाकी वाहने, घरे किंवा व्यवसायिक मालमत्ता आहे, त्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे.
हनी ट्रॅप प्रकरणावरही भुजबळ यांची प्रतिक्रिया
सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या हनी ट्रॅप प्रकरणावरही मंत्री छगन भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच स्पष्ट केले आहे की, हनी आणि ट्रॅप काहीही नाही. जर काही सीडी किंवा पुरावे असतील तर ते पोलिसांकडे द्यावेत, चौकशी झालीच पाहिजे.”
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘सीडीमुळे सरकार बदलले’ असा दावा केला होता, यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “मी त्यांच्या मताशी सहमत नाही.”