एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावडदा येथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

वावडदा दिनांक ०८/१०/२०२४ सोमवार रोजी एल. एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये नवरात्र निमित्त शाळेमध्ये गरबा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून श्री जितेंद्र पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. वीरेंद्र पाटील यांची उपस्थिती लाभली होती. सदर गरबा कार्यक्रमात इयत्ता नर्सरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व यांचे चार गट करण्यात आलेले होते. गरबा करिता विद्यार्थी निरनिराळ्या पोषकात मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यामध्ये चारही गटातून प्रथम, द्वितीय व तृतीय उत्तम वेशभूषा, उत्तम नृत्य अशी विजेते निवडण्यात आले व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके वितरण करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या प्राचार्य श्रीमती. जयश्री पाटील, पूर्व प्राथमिक विभागाचे प्रमुख श्रीमती. सुजिता सोळंके यांचे मार्गदर्शन लाभले, तर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले