बातम्या

कुलभूषण पाटील यांना एकदिलाने मतदानाची ग्वाही दिली

आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेडी येथे भव्य प्रचार रॅली व सभा आयोजित करण्यात आली. यावेळी खेडीतील विविध भागांतून प्रचार रॅली काढण्यात आली, ज्यामध्ये बैठक हॉल, पाटील वाडा, विनायक नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीकृष्ण मंदिर परिसर, शिव नगर, संभाजी नगर, दादाजी मंदिर परिसर, भगवान तात्या नगर, भगवान नगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर आदी परिसरांचा समावेश होता.

रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. त्यांनी खेडीतील विकासासाठी एकदिलाने आणि एक मताने कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याची ग्वाही दिली. या प्रसंगी नागरिकांनी ‘कुलभूषण पाटील यांना विजयी करा, खेडीचे भविष्य उज्जवल करा’ अशा घोषणाही दिल्या.

सभेत बोलताना कुलभूषण पाटील यांनी सांगितले की, “आपल्या पिढ्यांच्या प्रगतीसाठी व खेडीच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. तुमच्या विश्वासावर कायम ठरू, एकत्र येऊन खेडीला आणखी समृद्ध बनवू.” निवडणूक प्रचाराच्या या जोरदार सुरुवातीने खेडी परिसरातील नागरिकांचा उत्साह आणखी वाढला असून, आगामी निवडणुकीत विजय मिळवण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!