बातम्या

खडसे कुटुंब अडचणीत! जावई अटकेत, सून रक्षा खडसेंचा स्फोटक प्रत्यूत्तर

जळगाव श्री मराठी न्यूज । ८ ऑगस्ट २०२५ । पुण्यातील एका चर्चेतील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी केलेल्या छापेमारीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अटकेत आले. या घटनेनंतर राज्यातील राजकारण ढवळून निघालं असून, विरोधकांनी खडसे कुटुंबावर जोरदार टीका सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांनी प्रथमच खुलं वक्तव्य करत नाराजी व्यक्त केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले. त्यानंतर भाजपकडून एकनाथ खडसे यांच्याविरोधात जोरदार टीका आणि आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यात भाजप आमदारांनी खडसे यांच्यावर टीकेची झोड उठवत पत्रकार परिषद घेऊन आरोपांची सरबत्ती केली होती. या साऱ्या घडामोडींवर आता रक्षा खडसे यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या जे काही घडत आहे, त्याच्या वेदना मला सुद्धा होत आहेत,” असं सांगत त्यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या.

रक्षा खडसे म्हणाल्या: शेवटी राजकारण आहे. कशा पद्धतीने हे चाललं आहे, हे तुम्ही पाहता आहात. जळगाव जिल्ह्यात हे कुठेतरी थांबायला हवं. आरोपांच्या या मालिकेने आता सीमारेषा ओलांडली आहे.विकासावर भर द्यावा – रक्षा खडसे यांचा संदेश मंत्री म्हणून बोलताना त्यांनी पुढे म्हटलं, “कोणताही नेता असो, त्याने जिल्ह्याच्या विकासावर भर दिला पाहिजे. मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील जनतेच्या समस्या, शेतकरी आणि विकासाचे प्रश्न याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे.

🔸 राजकारणाच्या वादळात कुटुंबावर आघात?
खडसे कुटुंबाविरोधातील या आरोपांवरून रक्षा खडसे यांचा संयम सुटल्याचं चित्र दिसून आलं आहे. त्यांनी सुसंस्कृत आणि शांत परंतु ठाम पद्धतीने भाजपच्या काही नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!