बातम्या

वाहतूक पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड कारवाई साठी मैदानात

जळगाव, शहरातील कॉलेज व क्लासेस मध्ये येणारे विद्यार्थी हे मोटरसायकली घेऊन रस्त्यावर चालवीत आहे. या अल्पवयीन विनापरवाना चालवणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिले होते त्यानुसार चौथ्या दिवशी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड स्वतः मैदानात उतरून कारवाई करीत आहेत जळगाव शहरामध्ये असलेल्या शैक्षणिक क्लासेस व महाविद्यालयात अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात वाहने चालवीत आहेत त्यांना यापूर्वी समज दिल्यावरही अल्पवयीन मुलांची रोडावर वाहने चालवण्याची संख्या कमी झाली नाही याकरिता पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेडी यांच्या आदेशावरून जळगाव वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसापासून वाहन चालवणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई सुरू केली आहे मात्र तरीही विद्यार्थी ऐकत नसल्याने आज स्वतः वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड व त्यांच्या सहकारी मैदानात उतरले आहेतगायकवाड यांच्या या कृतीमुळे रोडवरील अपघातांची संख्या कमी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, त्यांनी नागरिकांमध्ये वाहतूक नियमांची शिस्त आणि जागरूकता वाढवण्याचे लक्ष ठेवले आहे.जळगाव शहरात वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!