वावडदे महावितरण उपकेंद्र येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ची भेट

वावडदे, दि. १५ आज वावडदे महावितरणचे सपस्टेशन येथे महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक माननीय दिलीप जगदाळे (IAS) साहेब यांनी मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी सर आणि जळगाव झोनचे अधीक्षक अभियंता माननीय अनिल महाजन सर यांच्यासमवेत वावळदा विभागाला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान (पीएम कुसुम योजना) अंतर्गत विविध कार्यांची पाहणी केली.
या योजनेत सौर उर्जा प्रकल्पांच्या स्थापनेसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मदत केली जाते, ज्यामुळे त्यांना स्वच्छ व स्थिर उर्जा मिळू शकते. योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना उर्जा सुरक्षेसोबतच त्यांच्या कृषी उत्पादनाची क्षमता वाढवण्यास मदत करणे आहे.
या संधीवर, वावडदा कक्ष कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता माननीय आकाश सोनवणे साहेब, ग्रामीण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विजय कापुरे साहेब, तसेच वावडदा कक्षाचे कर्मचारी संदीप अत्तरदे, दिनेश पाटील, जीवन रोकडे आदी उपस्थित होते.
सदर भेटीद्वारे, या महाअभियानाची अंमलबजावणी सुलभपणे करण्याच्या दृष्टीने चर्चाही करण्यात आली.