क्राईम

JIO मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरी करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात.

मा. श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जळगाव जिल्ह्यात मोबाईल टॉवरचे बॅटरी चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री दत्तात्रय पोटे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, गोरख बागुल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, राहुल बैसाणे, बिलास गायकवाड, भारत पाटील, सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.दिनांक १४/०९/२०२४ रोजी सदर पथकास गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, मंगरुळ गावातील भिकन युवराज पाटील हा संशयीत असल्याची बातमी मिळाली त्यावरून आम्ही सदर संशीतास ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून मोबाईल टॉवरचे बॅटरी व त्याचे अजुन साथीदार आहेत अगर कसे याबाबत विचारपुस करता त्याने कळविले की, माझे सोबत धर्मेद्र फकिरा पाटील, रा. मंगरुळ व अकरम अली कमरअली रा. गांधीपुरा अमळनेर यांचे नाव सांगीतल्याने धर्मेंद्र फकिरा पाटील यास ताब्यात घेवून अकरम अली कमरअली याचा अमळनेर शहरात शोध घेता तो मिळून आला नाही. त्यावर भिकन पाटील व धर्मेंद्र पाटील यांना विश्वासात घेवून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या बाबत विचारपुस केली असता भिकन पाटील याने मोबाईल टॉवरचे एकुण १२ बॅटऱ्या काढून दिल्यात.त्यावेळी भिकन युवराज पाटील यास सदर बॅटऱ्या बाबत विचारपुस केली असता त्याने सांगीतले की, मी, धर्मेंद्र पाटील व अकरम अली अश्या तिघांनी मिळून मारवड व अमळनेर शिवरात असलेल्या JIO मोबाईलच्या बॅटऱ्या चोरी केल्याचे सांगीतले.त्याबाबत खात्री केली असता १) मारवड पो.स्टे. CCTNS NO १२२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३(२), २)अमळनेर पो.स्टे. CCTNS NO २४९/२०२४ भादविकलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. त्यावेळी नमुद पथकाने मुख्य आरोपी भिकन युवराज पाटील याची माहिती घेता तो यापुर्वी JIO मोबाईल टॉवरचा टेक्नीशनचे काम करीत होता. तसेच तो बेटरी चोरी करतांना त्याचे यापुर्वीचे JIO कंपनीची आयकार्ड वापरुन चोरी करीत होता त्यामुळे त्यांचेवर कोणी संशय घेत नव्हते.आरोपी १) भिकन यवुराज पाटील, २) धर्मेद्र फकिरा पाटील, रा. मंगरुळ ता. अमळनेर या दोघांना तसेच त्यांनी गुन्ह्यात वापरलेले TATA ACE (छोटा हत्ती) मालवाहतुक गाडी मारवड पो.स्टे. CCTNS NO १२२/२०२४ भा.न्या.सं. कलम ३०३ (२) या गुन्ह्यात पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!