बातम्या

जामनेर तालुक्यातील नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा

जामनेर  तालुक्यातील विविध खेड्या मधील , तांडा वस्ती व शहरांमधील नागरिकांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, नुकत्याच झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पनात महायुती सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध शासकीय योजना घोषित केल्या ,असून यातील अनेक योजनांची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. या योजनेचा जामनेर तालुक्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान जामनेर तालुक्यातील शिवसेना तालुकाप्रमुख अँड भरत पवार यांनी केले आहे, महिलांना स्वावलंबी ,आत्मा निर्भर, करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, सुरू केली असून या योजनेचे योजनेअंतर्गत महिलांना स्वतःचा आधार लिंक असलेला बँक खात्यामध्ये दरमहा १५०० रुपये जमा होणार आहे, जास्तीत जास्त माता भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी जामनेर तालुक्यातील व फत्तेपुर, शेंदुर्णी, वाघारी, नेरी, तालुक्यातील शिवसेनेच्या पार्टीच्या वतीने गावागावात महिलांची नाव नोंदणी केली जात आहे ,मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत, योजनेअंतर्गत सात एचपी क्षमतेपर्यंत शेतीपंप धारक शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जाणार आहे .तसेच शेतीसाठी दिवसा अखंडित वीस पुरवठा व्हावा यासाठी मागील त्याला सौर ऊर्जा पंप योजना अंतर्गत राज्यातील ८ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देण्यात येणार असून ,राज्यासह जामनेर तालुक्यात देण्यात येणार असून राज्यसह जामनेर तालुका असंख्य शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे ,मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना करता कर्जावरील हमीची मर्यादा 30 कोटी रुपयांवरुन  500 कोटी रुपये करण्यात आली आहे, व्यवसायिक अभ्यासक्रम प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक ,सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या तसेच इतर मागासवर्ग या प्रवर्गातील मुलींना मोफत शिक्षण देण्यात येणार यांचा शासन निर्णय सोमवारी निसर्गरमित करण्यात आला असून ,व्यावसायिक शिक्षणासाठी मुलीचे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने सदरील ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना तालुकाप्रमुख   अँड भरत पवार यांनी राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे आभार मानले आहे🙏🏼

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!