जळगावचा मेहरुण बगीचा ड्रग्सकांड उघड! LCBचा मोठा सापळा
LCBचा दणका: ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त – आरोपी जेरबंद

जळगाव: जळगाव शहरातील मेहरुण बगीचा परिसरात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या दमदार पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सापळा रचून ड्रग्स माफियांचा डाव उधळला. यावेळी मोहम्मद हनीफ पटेल (वय-३५, रा. मास्टर कॉलनी) याला पकडण्यात यश आले, तर दुसरा आरोपी अरमान चिंधा पटेल पळ काढण्यात यशस्वी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही कारवाई दुपारी ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी विशेष मोहीम हाती घेत ड्रग्स माफियांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
एलसीबीचे निरीक्षक राहुल गायकवाड आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गोपनीय माहितीवरून मेहरुण बगीच्यातील जे.के. पार्क जुन्या स्विमिंग टँकजवळ सापळा रचला आणि छापा टाकून मोहम्मद हनीफ पटेलकडून ६ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर, दोन मोबाईल आणि एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू आहे.
जळगाव पोलीस प्रशासनाने नागरिकांना विश्वास ठेवून औषधांच्या गैरवापराविरुद्ध अत्यंत कठोर मोहिम हाती घेतल्याचे दाखवले आहे.