बातम्या

जळगाव विसर्जन मिरवणुकीपूर्वी धडाकेबाज तपासणी – सर्व मार्ग सज्ज!

विसर्जन मिरवणुकीचा मार्ग चमकणार – लाइट्स, खड्डे आणि सुरक्षा पूर्ण तयारीत!

२९ ऑगस्ट २०२५, जळगाव दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मिरवणुकीच्या सुरळीत आणि सुरक्षित आयोजनासाठी प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने आज (२९ ऑगस्ट २०२५) रोजी दुपारी १२:०० वाजता मिरवणुकीच्या मार्गाची सविस्तर तपासणी करण्यात आली.

या मार्ग तपासणीदरम्यान रस्त्यांवरील खड्डे, खाली लोंबकळणाऱ्या विद्युत वायरी, तसेच पाण्याचे साठलेले डबके या समस्यांची नोंद घेऊन तत्काळ निराकरण करण्याचे आदेश देण्यात आले. विशेषत: घाणेकर चौकापासून पुढील भागातील दोन्ही बाजूंना अतिरिक्त विद्युत रोषणाई बसविण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच महर्षी दधीची चौकातील खड्डे भरून काढणे आणि मिरवणूक मार्गावरील इतर महत्त्वाच्या अडचणी दूर करण्याचे नियोजन करण्यात आले.

या तपासणीवेळी जिल्हा महसूल विभागाकडून प्रांत अधिकारी श्री. विनय गोसावी, पोलिस विभागाकडून उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संदीप गावित तसेच नव्याने पदभार स्वीकारलेले श्री. नितीन गणापुरे उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. गिरीश सूर्यवंशी, महापालिकेचे उपआयुक्त गोसावी साहेब, श्री. प्रकाश पाटील, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि इतर विभागीय अधिकारी देखील या पाहणीत सहभागी झाले.

सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने अध्यक्ष श्री. सचिन नारळे आणि ज्येष्ठ पदाधिकारी श्री. किशोर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक सुरज दायमा यांच्यासह राहुल परकाळे, धनंजय चौधरी, चेतन संकत, राहूल संकत, भूषण शिंपी, गोपाल रामावत, विनोद अनपट, सुजय चौधरी आणि नितीन कोल्हे यांसारखे कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी झाले.

अधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गावरील सर्व त्रुटी तातडीने दूर करून सुरक्षित आणि सुव्यवस्थित विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या आहेत.

ही तपासणी झाल्यानंतर प्रशासन व गणेशोत्सव महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने मिरवणुकीच्या सुरक्षेसाठी अधिकाऱ्यांनी समन्वय वाढवून काटेकोर नियोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

विसर्जन मिरवणुकीपूर्वी धडाकेबाज तपासणी – सर्व मार्ग सज्ज! जळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!