बातम्या

एलसीबीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बबन आव्हाड

एलसीबीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बबन आव्हाड

एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या वृत्ताला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील हे नुकतेच सेवानिवृत्त झाले होते. हे पद रिक्त झाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे एलसीबीचा अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. दरम्यान, आव्हाड यांच्याकडे एलसीबीचा नियमित कारभार सोपवला जाणार असल्याची चर्चा पोलीस दलात सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!