बातम्या
जळगाव: होळी-धुलीवंदनपूर्वी पोलिसांची मोठी कारवाई, 27 जणांना ताब्यात घेऊन अवैध दारू कारखाने उद्ध्वस्त

जळगाव: आगामी होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर जळगाव एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील कंजरवाडा, तांबापुर, शिरसोली परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार, अवैध दारू विक्री व उत्पादनावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.