क्राईम

एलसीबीचा मोठा घाव: जळगावात कट्टा घेऊन उभा असलेला तरुण गजाआड!”

जळगाव प्रतिनिधी | २७ मे २०२५ :जळगाव शहरातील मेहरुण-भिलाटी परिसरात दहशत पसरवण्याच्या उद्देशाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. विशाल संजय पवार (वय अंदाजे २५, रा. भिलाटी, मेहरुण, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ३० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल मॅग्झिनसह जप्त करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवारी (दि. २७ मे) गुप्त माहिती मिळाली होती की, विशाल पवार हा मेहरुण भिलाटीजवळ पाण्याच्या हौदाजवळ गावठी कट्ट्यासह थांबलेला आहे. माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत, एलसीबी पथकाने घटनास्थळी धाव घेत त्याला ताब्यात घेतले.

झडतीदरम्यान विशालकडून लोखंडी गावठी पिस्तूल व मॅग्झिन सापडले. प्राथमिक चौकशीनंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव येथे आर्म अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यशस्वी कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सफौ. विजयसिंग पाटील, रवि नरवाडे, संजय हिवरकर, अतुल वंजारी, राजेश मेढे, पोहेका हरिलाल पाटील, विजय दामोदर पाटील, अक्रम शेख, प्रविण भालेराव, किशोर पाटील, प्रदीप चवरे यांचा मोलाचा सहभाग होता.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!