जळगाव जिल्हा नाभिक संघातर्फे संत सेना महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

जळगाव ( प्रतिनिधी) : जळगाव जिल्हा नाभिक संघाच्या वतीने संत सेना महाराज पुण्यतिथी मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली. दि. 20 ऑगस्ट 2025, बुधवार रोजी इंद्रप्रस्थ नगर येथील नाभिक समाज मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमापूजनाचे व पूजाविधीचे मानाचे कार्य जळगाव शहराच्या माजी महापौर सौ. सीमाताई भोळे, मा. नगरसेविका सौ. संगीताताई दांडेकर तसेच माजी मनपा इंजिनियर श्री. चंद्रकांत सोनगिरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी जळगाव जिल्हा नाभिक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. रामकृष्ण नथ्थू दांडेकर, तसेच समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांमध्ये राजेंद्र वाघ, रविंद्र पर्वते, एकनाथ दांडेकर, भास्कर क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, विनोद पर्वते, प्रकाश दांडेकर, भूषण वाघ, पवन झुंजारराव, मयूर जाधव,नितीन पर्वते, शशिकांत पर्वते, घनश्याम पर्वते, यांच्यासह अनेक समाज बांधव उपस्थित होते ,मान्यवरांच्या हातून वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या पुढील भागात सत्यनारायण महापूजा संपन्न झाली. यानंतर सर्व उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथी सोहळ्याला समाज बांधवांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.संत सेना महाराजांच्या कार्य, विचार व संत परंपरेचे महत्त्व या प्रसंगी मान्यवरांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले