मोटार सायकल चोरी करणारा अट्टल चोरटयास स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.

मा.श्री. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक सो. जळगाव, यांनी जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने सदर आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांना दिले.त्यावरुन मा.श्री बबन आव्हाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी श्री राहुल तायडे, दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, महेश सोमवंशी सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.वर नमुद पथकातील अमंलदार यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, करण लक्ष्मण गायकवाड रा. कल्याणे होळ ता. धरणगाव हा चोरीची मोटार सायकल घेवून फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर पथक हे बरेच दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. परंतु वर नमुद पथकातील अमंलदार यांनी करण गायकवाड यास त्याचे गावात असल्याची माहिती मिळाल्याने त्यास कल्याणे होळ ता. धरणगाव येथून ताब्यात घेवून त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सांगीतल्या प्रमाणे त्याचा साथीदार गोपाल सुरेश भिल, वय २२, रा. वराड ता. चोपडा असे दोघाना ताब्यात घेवून त्याचे कडून १,२०,०००/- रु. किं.च्या ४ मोटार सायकल जप्त करण्यात आल्या असून त्याबाबत १) चोपडा ग्रामीण पो.स्टे.ला गुरनं १८२/२०२३ भादवि कलम ३७९, २) चोपडा शहर पो.स्टे. ला गुरनं १९४/२०२४ भादवि कलम ३७९, ३) चोपडा शहर पो.स्टे.ला गुरनं ६३५/२०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल असून उर्वरीत १ मोटार सायकल यांचा शोध सुरु आहे.सदरची कारवाई मा.डॉ.श्री महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव, मा.श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.