जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदार संघात उमेदवारांचे समीकरण बिघडले ?
जळगाव : जळगाव जिल्ह्यामधील अकरावी विधानसभेसाठी फटाक्यांची आतिशीबाजीसह निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे सर्वात महत्त्वाचा मतदान हा फॅक्टर आज कोणाच्या बाजूने आहे हे कोणीच सांगू शकत नाही आहे फक्त गावात चौकात व मतदार संघात मोठमोठे बॅनर फ्लेक्स डिजिटल व्हॅन, व इतर माध्यमातून मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न सुरू आहे मतदार हा कोणाच्या बाजूने कल देणार यावर कोणीच लक्ष देण्यास तयार नाही फक्त आमच्याकडे लक्ष द्या फक्त आमच्याकडे लक्ष द्या हेच वाक्य जिकडे आणि तिकडे ऐकू येत आहे. त्यामुळे युती व आघाडीच्या काही मतदारसंघांमध्ये अतितटीच्या सामन्यासह उमेदवारांचे भविष्यही टांगलेल्या कंदीला सारखे झालेले आहेत. जिकडे वारा जाईल तिकडे हलणे अशी अवस्था आहेएरंडोल मतदारसंघात यंदा राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. चिमणराव पाटील आणि सतीश पाटील हे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून परिचित असले तरी, या निवडणुकीत चिमणराव पाटील माघार घेतल्यामुळे त्यांचा मुलगा अमोल पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र, अमोल पाटील यांचा प्रभाव अद्याप तितकासा जाणवत नाही, त्यामुळे ते स्पर्धेत आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.दुसरीकडे, भाजपामधून बंडखोरी करणारे ए. टी. नाना पाटील हे निवडणुकीत आघाडीवर आहेत. त्यांची पारोळा आणि इतर भागांवरील पकड ही त्यांच्यासाठी मोठी ताकद ठरत आहे. मतदारसंघाचा इतिहास पाहता, येथे सलग दुसऱ्यांदा कोणीही निवडून आलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीचा निकाल कोणत्या बाजूला झुकतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.एकूणच, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांच्या पारंपरिक समीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे, आणि मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात, यावरच सर्वकाही अवलंबून असेल.