बातम्या

भारताचा ‘व्हिजन मॅन’ जगभर गाजतोय! श्रीकांत शिंदेंचा दौरा ठरला ऐतिहासिक!

अंबरनाथ –शिवसेना (शिंदे गट) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अलीकडेच युएई, लायबेरिया, काँगो प्रजासत्ताक आणि सिएरा लिओन या देशांना भेटी देत आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची ठाम दहशतवादविरोधी भूमिका मांडली. त्यांच्या या दौऱ्याचा उद्देश ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात जागतिक समुदायाला जागरूक करणे आणि भारताच्या सुरक्षितता धोरणाची स्पष्ट मांडणी करणे हा होता.

या दौऱ्यादरम्यान डॉ. शिंदे यांनी विविध राष्ट्रांच्या अधिकाऱ्यांशी, धोरणकर्त्यांशी तसेच दहशतवादविरोधी आघाडीवर काम करणाऱ्या संस्थांशी सखोल संवाद साधला. “दहशतवाद ही केवळ एका देशाची समस्या नाही, ती संपूर्ण मानवजातीच्या अस्तित्वासाठी धोका आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर एकजूट होऊन याचा सामना करणे ही काळाची गरज आहे,” असा ठाम संदेश त्यांनी दिला.

विशेष म्हणजे, ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेच्या माध्यमातून भारताने घेतलेल्या पुढाकाराची आणि कार्यक्षमतेची त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर माहिती दिली. भारताची प्रतिमा केवळ संरक्षणाच्या बाबतीत नव्हे, तर धोरणात्मक निर्णयक्षमतेच्या पातळीवरही त्यांनी प्रभावीपणे मांडली.

या ऐतिहासिक दौऱ्यानंतर भारतात परतलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मुक्तागिरी बंगल्यावर अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष श्री. सुनील चौधरी यांनी मन:पूर्वक स्वागत केले. त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत सदिच्छा भेट दिली. केवळ एक औपचारिक भेट नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाला दिलेला सलाम असा या भेटीचा स्वरूप होता.

या भेटीद्वारे देशहितासाठी सातासमुद्रापार जाऊन आपली भूमिका मांडणाऱ्या डॉ. शिंदे यांच्या व्हिजनला व कामगिरीला अंबरनाथ शहरातील लोकप्रतिनिधींकडून मान्यता व गौरव मिळाल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!