बातम्या

विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक अभ्यासिकेचे उद्घाटन, जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम!

जळगाव / प्रतिनिधी, दि. 08 जून – जिल्हा परिषदेच्या 20 टक्के सेस फंडाचा प्रभावी वापर करत, जळगाव शहरातील विद्यानिकेतन शाळेत एक अत्याधुनिक आणि सुविधा संपन्न अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य आणि शांत वातावरण देण्याच्या हेतूने साकारण्यात आलेली ही अभ्यासिका अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे.

महिलेचा खून करणाऱ्या तिघा आरोपींना ४८ तासांत अटक

या अभ्यासिकेच्या उभारणीसाठी तब्बल 20 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असून, ही सुविधा पूर्णतः मोफत आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतील.

अभ्यासिकेची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • वातानुकूलित व सुसज्ज बैठकव्यवस्था

  • 24 तास वीज व उत्तम प्रकाश व्यवस्था

  • 60 विद्यार्थ्यांसाठी बसण्याची क्षमता

  • शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित

  • स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय

  • प्रेरणादायी व शांत वातावरण

मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यासिका कार्यान्वित करण्यात आली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत म्हटले आहे,

“अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचा लाभ घ्यावा आणि आपल्या यशाची दिशा निश्चित करावी.”

शिक्षणासाठी समर्पित अशा वातावरणाची विद्यार्थ्यांना नेहमी गरज असते. जिल्हा परिषदेचा हा उपक्रम केवळ अभ्यासाची जागा देत नाही, तर विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी एक नवा विश्वासही देतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!