बातम्या

ग्रामपंचायत किनोद येथे प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न..

ग्रामपंचायत किनोद, जे.पी.टेक मल्टिपर्पज फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किनोद येथे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न…

ग्रामपंचायत किनोद, जे.पी.टेक मल्टिपर्पज फाउंडेशन व गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने किनोद येथे आयोजित आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न झाले. यावेळी *अध्यक्षस्थानी मा. जि.प. सदस्य प्रतापराव पाटील* हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून *डॉ. कमलाकर पाटील (मा. सरपंच फुपनी-देवगाव), भादलीचे सरपंच किशोर बोरसे, उपसरपंच कमलाकर बोरसे, करंजचे सरपंच समाधान सपकाळे, सदस्य वासू सपकाळे, आमोद्याचे सरपंच भूषण सूर्यवंशी,* आणि परिसरातील डॉक्टर्स उपस्थित होते.

 

यावेळी *डॉ. कमलाकर पाटील* यांनी _सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य चांगले राखण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच सध्या हृदय विकाराचे प्रमाण वाढले असल्याने सर्वांनी नियमितपणे आरोग्य तपासणी करण्याचे आवाहन_ केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी *प्रतापराव पाटील* यांनी ग्रामपंचायत किनोद यांनी भव्य आरोग्य शिबीर आयोजित केले याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी *किनोद सरपंच संदिप पाटील, उपसरपंच, ग्रामसेवक दिलीप सपकाळे, डॉ. संदीप व्ही. पाटील, डॉ. संदीप जे. पाटील, डॉ. गणेश पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आणि सचिन बनसोडे* यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!