बातम्या

शहरात बंडाचे निशाण फडकले! डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी भाजपच्या उमेदवारास दिले आवाहन

जळगाव शहर भाजप बालेकिल्ला झालेला असताना व विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिकीट जाहीर झालेला असताना भाजपातील पदाधिकारी व गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय 2024 आमदारकीसाठी आश्वासित असलेले डॉक्टर अश्विन सोनवणे यांनी बंडाचा झेंडा उचलला आहे अशी विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळत आहे त्यामुळे विरोधी पक्षापेक्षा भाजपाला आतील बंड थोपविणे महत्त्वाचे राहणार आहे तर राज्याचे संकट मोचक गिरीश महाजन हे बंड थोपवण्यात यशस्वी राहतील का हे पाहणे ही महत्त्वाचे राहणार आहेजळगाव शहर हा पूर्वी शिवसेना किंवा माजी आमदार सुरेश दादा जैन यांचा बालेकिल्ला होता ते ज्या पक्षात जातील त्या पक्षातून त्यांना विजय मिळत होता मात्र भाजपा व शिवसेनेमध्ये युती तुटल्यानंतर प्रथम झालेल्या निवडणुकीतच सुरेश भोळे यांनी सुरेश जैन यांचा पराभव करून जळगाव शहरावर भाजपाचा झेंडा फडकविला. यानंतर शहरात तिसऱ्यांदा भाजपाने आमदार सुरेश भोळे यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. 2024 च्या निवडणुकीमध्ये आमदारकीसाठी आश्वासित असलेले उमेदवार डॉक्टर अश्विन सोनवणे यांना उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी आता बंडाचा झेंडा हाती घेतलेला आहे. सदर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध स्व पक्षांनी उभारलेला बंडाचा झेंडा असा सामना जळगाव शहरात विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना करावा लागणार आहे डॉक्टर अश्विन सोनवणे हे गिरीश महाजन यांचे सर्वात जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात मात्र त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्याच्या संकटमोचक काय भूमिका घेणार व हा बंड थोपविण्यात यशस्वी होणार का हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे तर दुसरीकडे युतीचे पचोरा येथील उमेदवार किशोर पाटील यांच्या विरोधात भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी सुद्धा बंडाचा झेंडा हाती घेतल्याची माहिती मिळत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!