बातम्या

माझ्या मायबाप जनतेची आज मिळालेली ही साथ नक्कीच मी सार्थ ठरवेल आणि कायम तुमच्या सोबत असेल अशी ग्वाही देतो – धनंजय चौधरी

जनतेत वातावरण तापले असून वीस तारखेपर्यंत हेच वातावरण वातावरण टाकून ठेवा आणि महायुतीच्या या सरकारला यात तापलेल्या वातावरणात बाहेर टाका . आज माझ्या मायबाप जनतेने माझ्या ज्येष्ठ सगळ्या नेत्यांनी महाविकास आघाडी मधील सगळ्या नेते मंडळींनी पदाधिकाऱ्यांनी तरुण कार्यकर्ते मित्रांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला ,जो आशीर्वाद दिला तो या जनसागरातून दिसून येतोय हीच माझी खरी ताकद आहे मी शब्द देतो मी कायम तुमच्यासोबत राहील असे प्रतिपादन युवा नेतृत्व धनंजय चौधरी यांनी जाहीर सभेत केले रावेर यावल विधानसभा क्षेत्र निवडणुकीसाठी धनंजय चौधरी यांनी 29 ऑक्टोबर रोजी आपला अर्ज दाखल केला.29 ऑक्टोबर रोजी रावेर यावल विधानसभा क्षेत्र निवडणुकीसाठी मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला . . या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आपले उमेदवारी अर्ज त्यांनी अनेक नेते मंडळी च्या उपस्थितीत दाखल केला. याप्रसंगी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे साहेब, आ.शिरीषदादा चौधरी,बऱ्हाणपूर चे माजी आमदार सुरेन्द्रसिंग ठाकूर(शेरा भैय्या)ज्येष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील,शिवसेना जिल्हा समन्वयक प्रल्हादभाऊ महाजन,माजी आमदार रमेशदादा चौधरी हाजी छत्ब्बीर शेठ,श्रीराम दादा पाटील प्रदेश उपाध्यक्षा प्रतिभाताई शिंदे ,मुक्ती हारून नदवी साहब, एजाज भाई मलिक, श्री लिलाधर शेठ चौधरी ,मा. राजू अमीर तडवी ,डॉ राजेंद्र पाटील, प्रभाकर अप्पा सोनवणे ,श्री मुकेश येवले सर ,श्री किशोर पाटील ,अविनाश पाटील, रवींद्रदादा पाटील, सोपान बाबुराव पाटील,सोपान साहेबराव पाटील,गोंडू महाजन, विलासशेठ तायडे ,शेखर पाटील,यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. या रॅलीत सहभागी होऊन जनसामान्यांनी दिलेले आशीर्वाद हे उद्याच्या विजयाची नांदी आहेत. जाहीर सभेमध्ये बोलताना अनेक नेत्यांनी आपल्या कणखर शब्दात महायुतीवर हल्लाबोल केला. प्रसंगी धनंजय चौधरी बोलताना सांगितले की, या जनसागराचा आणि लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मला प्रत्यय आला. यावेळी नागरिकांची तुफान गर्दी मी अनुभवली. मी त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही ही या निमित्ताने ग्वाही देतो. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची साथ मला मिळाली अनेक ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि तरुण युवक कार्यकर्ते माझे मित्र यांची भरभरून उपस्थिती सभेत आणि रॅलीत मी पाहून भारावून गेलो. माझ्या महाविकास आघाडी मधील सर्व जेष्ठ नेतेमंडळी पदाधिकारी यांनी त्यांचा अमूल्य वेळ काढत आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे ते राहिले याबद्दल देखील मी त्यांचा कायम ऋणी राहील. तसेच सर्व जनतेने त्यांच्यातीलच एक असल्याची भावना त्यांनी मला जाणीव करून दिली या पूर्ण मतदारसंघातील विकासाकरता मी कायम कटिबद्ध राहील हा विश्वास मी या दिवशी त्यांना देतो.. या रॅलीत सहभागी होऊन जनसामान्यांनी दिलेले आशीर्वाद हे उद्याच्या विजयाची नांदी आहेत. जनआशीर्वाद रॅलीत सहभागी सर्व नागरिक, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मी आभार व्यक्त करतो.आपल्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले हे आशीर्वाद असेच कायम ठेवा अशी आशा बाळगतो. तुमच्या सर्वांच्या साथीने रावेर_यावल विधानसभा क्षेत्राला विकासाच्या नव्या उंचीवर नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे. असे देखील मत व्यक्त केले… आपला भाऊ धनुभाऊ चा गजर… यावेळी रावेरी यावल विधानसभा क्षेत्रातील नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. ढोल ताशे आणि गाण्यांच्या गजरात आपला भाऊ धनुभाऊ चा गजराने परिसर दुमदुमला.. तरुणांमध्ये आपला भाऊ धनुभाऊ ची चांगलीच क्रेझ यावेळी पाहायला मिळाली. यात तरुणांची उपस्थिती लक्षणीय होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!