असोदा येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

जळगाव (असोदा), १२ फेब्रुवारी २०२५ (बुधवार): असोदा गावातील श्री संत रोहिदास चौक, तेली वाडा येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गजानन महाराज यांच्या संगीतमय भक्तिगीतांनी वातावरण भक्तिरसात न्हालून निघाले.
या सोहळ्यास गावातील प्रतिष्ठित मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. प्रमुख पाहुणे म्हणून गावाचे सरपंच, उपसरपंच गिरीशभाऊ भोळे, ग्रामपंचायत सदस्य सुनीलभाऊ पाटील, बाळूभाऊ पाटील यांची उपस्थिती लाभली. तसेच गावातील इतर प्रतिष्ठित ग्रामस्थ, चौकातील समाजबांधव आणि विविध समाजाचे मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज, श्री गजानन बाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन व पुष्पहार अर्पण करून आरती करण्यात आली. यानंतर सर्वांनी एकत्रितरित्या संत रोहिदास महाराजांना अभिवादन केले. सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि व्यवस्थापनासाठी श्री सतिषभाऊ डोळसे, जगन्नाथ वानखेडे, रामदास भारुडे, सुनिल वानखेडे, राजू वानखेडे, निलेश शोकोकर, गणेश डोळसे, अजय ठोसर, राहुल वडनेरे, दीपक उमरे, अशोक वानखेडे, लीलाधर डोळसे, विघ्नेश वाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी समाज मार्गदर्शक श्री सतिषभाऊ डोळसे यांनी सर्व मान्यवर, श्री गजानन महाराज भक्त संगीत मंडळ, तसेच उपस्थित समाजबांधवांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.