बातम्या

हॉटेलसमोरील गोळीबार प्रकरण उघड! तब्बल २५ दिवसांनंतर आरोपी गाढ झोपेत जेरबंद!

श्री मराठी न्यूज | ६ ऑगस्ट २०२५ | यावल/जळगाव दिनांक १० जुलै २०२५ रोजी रात्री ९ वाजता, डोंगाव शिवारातील हॉटेल रायबा समोर अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. प्रमोद श्रीराम बाविस्कर, रा. पुनगाव, ह. मु. चंदू अण्णा नगर, जळगाव यांच्यावर अज्ञात इसमाने बंदुकीने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले होते.

 

सदर घटनेबाबत यावल पोलीस ठाण्यात CCTNS No. 297/2025 अंतर्गत भा.दं.वि. कलम 109(1), 3(5) व हत्यार कायदा 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी एकही CCTV नसतानाही, पोलिसांनी या गुन्ह्याचा फारच बारकाईने तपास सुरू ठेवला.

👮‍♂️ पोलिसांच्या तपासाची थरारक कामगिरी:

या प्रकरणाची गंभीरता ओळखून मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग केला. श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सोपान गोरे व पो.उ.नि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके गठीत करण्यात आली.

CCTV नसतानाही घटनास्थळाचा अभ्यास, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीचे विश्लेषण यांच्या मदतीने पोलिसांनी म्हणजे LCB टीम ने गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले.

🕵️‍♂️ तब्बल २५ दिवसांच्या अथक तपासानंतर, पोलिसांनी केलेली कारवाई थक्क करणारी होती:

पोलीस पथकांनी आरोपींचा पाठलाग करून नाशिक, अडावद, अमलवाडी व उमटी येथे छापे टाकले आणि गाढ झोपेत असलेल्या आरोपींना अचानकपणे ताब्यात घेतले. या कारवाईने आरोपींच्या पायाखालची जमीन सरकली!

🔒 अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे:

1️⃣ दर्शन रविंद्र देशमुख (२५), रा. देशमुख वाडा, अडावद

2️⃣ गोपाल संतोष चव्हाण (२५), रा. सोनार गल्ली, अडावद

→ दोघांना नाशिक येथून अटक.

3️⃣ किशोर मुरलीधर बाविस्कर (४०), रा. कोल्हे हिल्स, वाघनगर, जळगाव

4️⃣ विनोद वसंतराव पावरा (२२), रा. अमलवाडी, ता. चोपडा

5️⃣ सुनिल सुभाष पावरा (२२), रा. उरमटी, ता. चोपडा

→ तिघांना अडावद, अमलवाडी आणि उमरठी येथून त्यांच्या घरातून गाढ झोपेतच ताब्यात घेतले.

👮‍♂️ पोलिसांच्या तपासाची थरारक कामगिरी:

या प्रकरणाची गंभीरता ओळखून मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांनी गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग केला. श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. सोपान गोरे व पो.उ.नि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथके गठीत करण्यात आली.

CCTV नसतानाही घटनास्थळाचा अभ्यास, तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीचे विश्लेषण यांच्या मदतीने पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले.

🕵️‍♂️ तब्बल २५ दिवसांच्या अथक तपासानंतर, पोलिसांनी केलेली कारवाई थक्क करणारी होती:

पोलीस पथकांनी आरोपींचा पाठलाग करून नाशिक, अडावद, अमलवाडी व उमटी येथे छापे टाकले आणि गाढ झोपेत असलेल्या आरोपींना अचानकपणे ताब्यात घेतले. या कारवाईने आरोपींच्या पायाखालची जमीन सरकली!

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मा. डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडे वर्ग केला. त्यानंतर श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, यांनी पो.उ.नि. सोपान गोरे व पो.उ.नि. शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली.

घटनास्थळाचा बारकाईने अभ्यास, तांत्रिक विश्लेषण आणि अथक प्रयत्नांनंतर पो.उ.नि. सोपान गोरे यांच्या पथकाने गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न केले. त्यानंतर पो.उ.नि. शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र वल्टे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक, उमटी व अडावद येथे विशेष मोहिम राबवण्यात आली.

सदर आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून विश्वासात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरण्यात आलेले अग्नीशस्त्र व मोटरसायकल जप्त करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून पुढील तपास पो.उ.नि. सोपान गोरे करत आहेत.

👮‍♂️ सदर यशस्वी कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

मा. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव मा. श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव मा. श्री. विनायक कोते, उपविभागीय पोलीस अधिकारी, अमळनेर

👮 कार्यवाहीत सहभागी अधिकारी व अंमलदार:

श्री. संदीप पाटील, वरिष्ठ पो.नि., स्था.गु.शा., जळगाव पो.नि. रंगनाथ धारबळे स.पो.नि. अजयकुमार वाढवे (यावल पो.स्टे)पो.उ.नि. शरद बागल, सोपान गोरे, जितेंद्र बलटे पो.हे.काँ. सुनिल दामोदरे, प्रितम पाटील, यशवंत टहाकळे, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, विलेश सोनवणे, संदीप चव्हाण पो.कॉ. बबन पाटील, सिध्देश्वर डापकर, रावसाहेब पाटील, ईश्वर पाटील, गोपाल पाटील चालक पो.कॉ. महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील पो.हे.कॉ. वासुदेव मराठे, संदीप सूर्यवंशी पो.ना. किशोर परदेशी पो.कॉ. सचिन पाटील, योगेश खोंडे, भरत कोळी, सागर कोळी (सर्व यावल पो.स्टे.

अधिक तपासात आरोपींकडून कबुली:

स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून, विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरलेले अग्नीशस्त्र व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून

विशेष: या कामगिरीने स्थानिक गुन्हे शाखेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. पोलिस दलाच्या या जलद कारवाईमुळे नागरिकांत विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!