Gulabrao Patil गुलाबराव पाटलांची ग्रामीण ताकद किती ?

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाची! राज्याचे ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघाने स्मिताताई वाघ यांना तब्बल ६३ हजार १४० मतांचा लीड दिला आहे. या मतदारसंघाची धुरा गुलाबराव पाटील व जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांनी सांभाळली होती. बुथनिहाय आकडेवारी पाहता २ न.पांसह ८ जि.प.गट, १६ पं.स. गण, १४२ ग्रामपंचायती गुलाबराव पाटलांच्या पाठीशी उभे राहिल्याचे स्पष्ट होते.
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघात धरणगाव नगरपालिका व नशिराबाद नगरपरिषद हे दोन न.पा. शहरी भाग येतात. यासह ८ जिल्हा परिषद गट, १६ पंचायत समिती गणांसह १४२ ग्रामपंचायती व १८८ गावांचा या मतदारसंघात समावेश आहे. सर्व जाती धर्माचा असलेला हा मतदार संघ गेल्या ३० वर्षांपासून लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीचा अभेद्य गड राहिला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारांनी अनेकवेळा बंडखोरी केल्यानंतरही विधानसभेत शिवसेनेचा झेंडा फडकला आहे. शिवसेनेचे नेते तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुळे हा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला झाला आहे.