बातम्या

“हात धरून मदतीचा आधार” – जळगाव ट्रॅफिक पोलिसाचं कौतुकास्पद कृत्य

जळगाव – शहरातील आकाशवाणी परिसरात आज एक हृदयस्पर्शी घटना घडली. शहरातील वाहतूक शाखेतील पोलिस कर्मचारी हवालदार भूषण मोरे यांनी आपल्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन माणुसकीचं उदाहरण साऱ्यांसमोर ठेवलं.

घटना अशी की, आकाशवाणी चौकात सकाळच्या गर्दीच्या वेळी एक वृद्ध महिला रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. वयोमानानुसार त्यांना चालण्यात अडचण येत होती. ही गोष्ट तेथे ड्युटीवर असलेल्या ट्रॅफिक पोलिस हवालदार भूषण मोरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ पुढे जात, त्या वृद्ध महिलेला आधार देत हात धरून सुरक्षितपणे रस्ता पार करून दिला.

 

या घटनेचे  मोबाईलमध्ये चित्रिकरण केले असून, सोशल मीडियावर या ट्रॅफिक पोलिसाच्या माणुसकीच्या कृत्याचं कौतुक होत आहे. नागरिकांनी अशा संवेदनशील पोलिस कर्मचाऱ्यांचे आभार मानले असून, समाजात सकारात्मक संदेश पसरत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

या प्रकारातून पोलिसांच्या वर्दीमागे असलेलं माणूसपण पुन्हा एकदा समोर आलं असून, जळगाव शहरातील ट्रॅफिक पोलिस विभागाच्या शिस्तबद्ध व सामाजिक भान असलेल्या कामगिरीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!