महाराष्ट्रात २१ जुलैपासून जोरदार पावसाची शक्यता, ३२ जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Maharashtra Rain Alert

मुंबई | २१ जुलै २०२५ – महाराष्ट्रात श्रावणातील पहिल्या सोमवारी, म्हणजे २१ जुलैपासून २८ जुलैपर्यंत पुढील आठवडाभर राज्यातील ३२ जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
फक्त आधार कार्डवर ₹20,000 मिळवा १० मिनिटांत ₹20,000 खात्यात
कोकण व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता
मुंबईसह संपूर्ण कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) आणि संपूर्ण विदर्भात (अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ) या ११ जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते.
लालपरी प्रवाशांसाठी खुशखबर! आता राज्यातील ‘या’ लोकांना १००% मोफत प्रवास मिळणार
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरही दमदार पावसाचे संकेत
नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरील भागांमध्ये – त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, पाटण, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, चंदगड – पावसाचा जोर अधिक जाणवणार आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाकडून माहिती लपवली जातेय?
खान्देश, कोल्हापूर व मराठवाड्याच्या काही भागातही पावसाची शक्यता
नंदुरबार, जळगाव, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त झाली आहे.
मराठवाड्याच्या काही भागात किरकोळ पाऊस
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील पट्ट्यातील काही तालुक्यांमध्ये (जसे की नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील मैदान भाग) फक्त तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.
UPI व्यवहाराचे चे नवीन नियम लागू होणार का
धरणात पाणीसाठा वाढण्याची शक्यता
गेल्या काही आठवड्यांत तुरळक पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमधील पाणीसाठा अपुरा आहे. मात्र २१ ते २८ जुलैदरम्यान होणाऱ्या जोरदार पावसामुळे गोदावरी, कृष्णा, भीमा, कोयना, नीरा, मुळा, मुठा, कुकडी, गिरणा, वैतरणा यासारख्या नद्यांच्या खोऱ्यात पाण्याचा विसर्ग वाढणार आहे. परिणामी, जायकवाडीसह इतर प्रमुख धरणांमध्येही जलसाठा वाढण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्याचा अंदाज
११ ते २४ जुलैदरम्यान मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात उघडीप अधिक जाणवत होती. मात्र उद्या सोमवारपासून (२१ जुलै) वातावरणात बदल होऊन, राज्यातील बहुतांश भागात पावसाचे पुनरागमन होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलै महिना सरासरीपेक्षा अधिक पावसासह पूर्ण होण्याची शक्यता आहे.
नागरिकांसाठी सूचना
राज्यातील नागरिक, विशेषतः नदीकाठच्या व डोंगराळ भागांतील नागरिकांनी सावध राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.