आरोपींना फाशी द्या!” – हजारो ग्रामस्थांनी जळगावमध्ये ठोकले जोरदार नारे!

जळगाव, दि. २७ जून – एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे चौदा वर्षीय बालकाची अत्यंत निर्दयपणे हत्या झाल्यानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या हत्येमागे नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर आज हजारोंच्या संख्येने संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला.
शहरातील शिवतीर्थ मैदानापासून सुरू झालेल्या या मोर्चात महिलांचा आणि पुरुषांचा मोठा सहभाग होता. “आरोपींना फाशी द्या, नरबळीचा तपास करा”, “CBI चौकशी करा”, “उज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करा” अशा जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
गावात नवा सरपंच निवडून
गुन्ह्यात नरबळीचा संशय – कलम वाढवण्याची मागणी
हत्येमध्ये बालकाचा केवळ गळा कापण्यात आलेला असून त्याच्या शरीरावर इतर कुठल्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रकार नरबळीचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावरून नागरिकांनी तात्काळ या गुन्ह्यात नरबळीविषयक कलमांचा समावेश करावा आणि तपास त्या अनुषंगाने पुढे न्यावा अशी ठाम मागणी केली.
CBI चौकशीची मागणी व निकम यांची नियुक्ती
ग्रामस्थांनी या प्रकरणाची तपास यंत्रणेवर अविश्वास दर्शवत, तपास CBI कडे वर्ग करावा, तसेच यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून सुप्रसिद्ध अधिवक्ता उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना केली.
अपघाताचा बनाव रचून जीवे मारण्याचा प्रयत्न
मोर्चात हजारोंचा सहभाग – संतप्त ग्रामस्थांची घोषणाबाजी
रिंगणगावसह एरंडोल तालुक्यातील विविध गावांतील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांनीही मोठ्या संख्येने हातात फलक घेऊन, विविध घोषणा देत प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची तसेच सरळ फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक
खासदार स्मिता वाघ यांची उपस्थिती
मोर्चाचे गांभीर्य लक्षात घेता भाजपच्या खासदार स्मिता वाघ या स्वतः मोर्चात सहभागी झाल्या. त्यांनी ग्रामस्थांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन यावेळी दिले. तसेच त्यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास यंत्रणांनी पारदर्शक आणि वेगाने कार्यवाही करावी, अशी मागणी देखील केली.
One Comment