पिंपळगाव हरेश्वर येथे अडीच लाखांचा गुटखा पकडला
२,४१,८३६/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित माल जप्त – वाचा संपूर्ण तपशील!

जळगाव श्री मराठी न्युज । दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यातील विठ्ठलपुरा भागातील गायत्री किराणा दुकानात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व सुगंधीत तंबाखू साठवले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीसांनी ताब्यात कारवाई केली.
पोलीसांच्या माहितीनुसार, आरोपी श्रीकृष्ण भगवान क्षिरसागर (वय 46, रा. पिंपळगांव हरेश्वर, ता. पाचोरा) यांच्या ताब्यातून एकूण २,४१,८३६/- रुपये किंमतीचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुगंधीत पान मसाला व तंबाखू जप्त करण्यात आला आहे. पोलीसांनी सांगितले की, हा साठा विक्रेते चोरीच्या उद्देशाने विक्रीसाठी आणत होते.
सदर घटनेनुसार पिंपळगांव हरे पोलीस स्टेशनमध्ये भाग-५, गुन्हा क्र. २८४/२०२५ नोंद करण्यात आला असून FIR नुसार भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम २६(१), २६(२)(iv), २७(२)(c)(d), २७(३)(d)(e), ३ व ५९ प्रमाणे कारवाई सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक चाळीगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा भाग अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये सपोनि कल्याणी वर्मा, ग्रेपोउपनि प्रकाश पाटील, पोहेकॉ/८५८ तात्याबा नागरे, पोना/१९०३ पांडुरंग गोरबंजारा यांनी सहभाग घेतला.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि विठ्ठल पवार हे करत आहेत. पोलीसांनी नागरिकांना सूचित केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित वस्तूंचा व्यापार कायद्यानुसार गुन्हा ठरेल आणि त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.